अहमदनगर

जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद मृत्यू; SIT चौकशीच्या मागणीने खळबळ


मुंबई

भामटा अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि ईशानेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खरात यांच्या निकटवर्तुळातील महत्त्वाचे पद भूषवत असल्याने शेळके यांच्या निधनामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ एक अपघात आहे की त्यामागे काही मोठे कारस्थान दडलेले आहे, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून योग्य निर्देश द्यावेत आणि सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या