अहमदनगर

'चालत्या गाडीला खिळा मारण्यात काही लोक तज्ज्ञ'; गडकरींनी कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांचे टोचले कान


नागपूर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात कंत्राटदार आणि सरकारी यंत्रणेतील त्रुटींवर आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. '२४/७ वॉटर सप्लाय इंजिनीअरिंग' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अनेक सरकारी योजना केवळ कागदावर किंवा तांत्रिक त्रुटींमुळे अडकून पडल्या आहेत. काही ठिकाणी तर पाण्याचा स्रोत उपलब्ध नसतानाही योजना पूर्ण झाल्याचा दावा केला जातो, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. कंत्राट देण्याच्या प्रक्रियेवर टीका करताना ते म्हणाले की, आता केवळ 'काळा कोट घालून येणारा कंत्राटासाठी पात्र ठरेल' एवढीच अट उरली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला असून, काही लोक केवळ चालत्या गाडीला खिळा मारून कामे कशी थांबवता येतील यातच तज्ज्ञ असल्याचे सांगितले. अनेक डीपीआर कन्सल्टंट प्रत्यक्षात जागेवर न जाता घरात बसून गुगलच्या मदतीने आराखडे तयार करतात, ज्यामुळे प्रकल्पांचा बोजवारा उडतो. या संपूर्ण क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज असून, सरकारमधील अनावश्यक अडथळे दूर झाल्याशिवाय विकास वेगाने होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या