अहमदनगर

मनमाड रेल्वे स्थानकावर थरार: मृत्यूच्या छायेखाली २५ हजार व्होल्टच्या तारांवर जीवघेणी हाणामारी


मनमाड

नाशिक जिल्ह्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली असून त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहेत. काही तरुण रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक तारांच्या खांबावर चढले आणि तब्बल ४० फूट उंचीवर २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह असलेल्या तारांजवळ एकमेकांशी भिडले. अंगावर कपडे नसलेले हे तरुण अत्यंत रागाच्या भरात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. या थराराची भीषणता तेव्हा अधिक वाढली जेव्हा त्यांच्या खालून मनमाड-काकिनाडा-शिर्डी एक्सप्रेस वेगाने धावत होती. जराशीही चूक किंवा तारेशी झालेला स्पर्श या तरुणांचा कोळसा करू शकला असता, मात्र मृत्यूच्या दारात असूनही त्यांचे भांडण सुरूच होते. प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी हे दृश्य पाहून भयभीत झाले होते. रेल्वे प्रशासनाने अद्याप यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, हे तरुण इतक्या उंचीवर कसे पोहोचले आणि हा प्रकार नक्की कशामुळे घडला याचा तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या