अहमदनगर

१ टन कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात शून्य रुपये; उलट भरावा लागला १ रुपया


छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे १ टन २ क्विंटल ६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याला पदरात काहीच पडले नाही, उलट त्याला १ रुपया खिशातून द्यावा लागला. शेतकरी प्रकाश गलंदर यांनी आपला कांदा विक्रीसाठी नेला असता त्यांना १२६२ रुपये उत्पन्न मिळाले, मात्र हमाली, तोलाई आणि वाहतूक असा एकूण खर्च १२६३ रुपये झाला. ४ एकर रानात कांदा लावण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले होते, पण बाजारभाव कोसळल्याने त्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी घेतलेले ५-६ लाखांचे कर्ज फेडण्याची आशा या पिकावर होती, मात्र हाती काहीच न आल्याने त्यांनी उरलेला कांदा शेतात फेकून दिला आहे. या घटनेनंतर कृषी विभागाने पंचनामा केला असून, विरोधकांनी आणि शेतकरी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत तात्काळ मदतीची आणि हमीभावाची मागणी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या