अहमदनगर

पुण्यात धक्कादायक घटना: पतीशी वादातून महिलेची ८ व्या मजल्यावरून उडी, बाल्कनीला लटकतानाचा व्हिडिओ व्हायरल


पुणे

पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातून एक अतिशय थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील 'अर्बन लाईफ टावर' या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. पतीसोबत झालेल्या जोरदार भांडणानंतर रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. प्रतिभा शंकर असे या मृत महिलेचे नाव असून, घटनेपूर्वी त्यांचे पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात प्रतिभा यांनी थेट बाल्कनीतून खाली उडी घेतली. ही संपूर्ण घटना शेजारील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून, व्हिडिओमध्ये महिला काही काळ बाल्कनीला लटकताना दिसत आहे. लोकांनी आरडाओरडा करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षणार्धात तिची पकड सुटली आणि ८ व्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळक उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या