अहमदनगर

केव्हीके मधील कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

केव्हीके मध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचे प्रशिक्षण संपन्न


दहीगाव

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी "खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण कार्यक्रम" दिनांक १ ते १५ जून २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.



या प्रशिक्षणामध्ये अकोले, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, शेवगाव व राहाता तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव व ३० प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कॉमन सर्विस सेंटर, महाराष्ट्र चे असिफ पठाण, राहुल काळे हजर होते. हा कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर चे उपाध्यक्ष श्री.रस्तोगी देवेंद्र यांचा मोलाचा वाट होता.

प्रशिक्षणामध्ये मृदाशास्त्र, खतटंचाईमुळे युरिया व डीएपी यांची कमतरता भासत असून त्यास पर्याय म्हणून मिश्र व संयुक्त खताचा वापर व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,  नैसर्गिक  शेती,  बियाणे तंत्रज्ञान, पीक उत्पादन तंत्रज्ञान, कीड व रोग ओळख, तण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुरक्षित कीटकनाशक वापर, कृषी निविष्ठा विक्रीसंबंधी कायदे व नियम, कृषी व्यवसाय व्यवस्थापन तसेच खतांची टंचाई  लक्षात  घेऊन,  ग्राहक सेवा कौशल्ये यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. त्याचसोबत एल निनोचा प्रभाव बाबतीत मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, गटचर्चा, नैसर्गिक शेतीचे  प्रात्यक्षिक, क्षेत्र भेटी, आणि अध्ययन सहलींच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. कृषी सेवा केंद्राचे प्रभावी व्यवस्थापन, साठा नियंत्रण, संगणकीय नोंदी ठेवणे आणि सुरक्षितता उपाययोजना याबाबतही विविध तज्ञ शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काकासाहेब शिंदे, संचालक श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था यांनी सांगितले की, कृषी निविष्ठा विक्रेत्यांची भूमिका केवळ निविष्ठांची विक्री करण्यापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना योग्य व शास्त्रशुद्ध सल्ला देणारा सक्षम मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य करणे आवश्यक आहे.

कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक यांनी प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

नवी दिल्ली येथून कॉमन सर्विस सेंटर, मॅनेजर श्री.मिथिलेश सिंग हे ऑनलाईन पद्धतीने  हजर होते, त्यांनी मार्गदर्शन करताना रासायनिक खताच्या टंचाईच्या काळात शेतक-यांना नैसर्गिक शेती विषयी मार्गदर्शन करण्यासाठी सहकार क्षेत्रातील या प्रशिक्षित मन्युष्य  बळाचा महत्वाचा वाटा राहणार आहे. सदर प्रशिक्षण आयोजन करण्यासाठी त्यांनी कृषि विज्ञान केंद्राचे विशेष आभार मानले.  

या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक निबंधक, शेवगाव चे अमोल माने, दहीगाव ने चे उपसरपंच श्री सुर्यकांत पाऊलबुद्धे, सुलतानपूर चे सरपंच श्री बाळासाहेब धोंडे, प्रगतीशील शेतकरी श्री राजेश कडू पाटील हे देखील हजर होते. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाबाबत अतिशय समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या