अहमदनगर

लातूरमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या ५८ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; एसपी अमोल तांबेंचा शिस्तीचा बडगा


लातूर

रस्ते सुरक्षेचे उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी लातूर जिल्ह्यात स्वतः ५८ पोलीस कर्मचाऱ्यांवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य केले जात असून, त्यापूर्वीच नियमांची अंमलबजावणी पोलीस दलापासून सुरू करण्यात आली आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले आहे की, कायदा राबवणाऱ्या यंत्रणेने आधी स्वतः नियमांचे पालन केले पाहिजे, त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला सूट दिली जाणार नाही. या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्यात विनाहेल्मेट येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून थेट कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे ही केवळ दंडात्मक कारवाई न ठरता, या उल्लंघनाची नोंद संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या अधिकृत सर्व्हिस बुकमध्ये केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या