अहमदनगर

रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; दुचाकींच्या हेडलाइट्ससाठी लवकरच लागू होणार 'हा' नवीन नियम!


नवी दिल्ली

देशातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी वाहन चालकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्यानुसार १ एप्रिल २०२८ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन दुचाकींमधील ऑटोमॅटिक हेडलाइट्स हे केवळ लो-बीम किंवा पासिंग बीम मोडवरच कार्य करतील.

सध्याच्या ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन (AHO) सिस्टीममध्ये वाहनाच्या सेटिंगनुसार हाय-बीम किंवा लो-बीम सुरू राहते, ज्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडतो आणि अपघाताचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी हेडलाइट्सची तीव्रतेची मर्यादाही कमी करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार दुचाकींसाठी हेडलाइटची कमाल मर्यादा १.५ लाख कँडेलावरून १ लाख कँडेला, तर चारचाकी वाहनांसाठी २.२५ लाख कँडेलावरून १.५ लाख कँडेला करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्राणघातक अपघातांना आळा घालणे आणि रस्त्यावरील दृश्यमानता सुधारणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या