अहमदनगर

सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी; तमिळनाडूच्या बजेटमध्ये महिला अन् Gen-Z विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा


तामिळनाडू

तमिळनाडूतील टीव्हिके सरकारने विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी 'सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी' योजनेकरिता ८१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी आणि अनुदानित शाळांमधील ११ वीच्या विद्यार्थ्यांना गिअर, हेल्मेट आणि पाण्याची बाटली असलेल्या आधुनिक सायकली वाटल्या जाणार असून त्यासाठी २७७ कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच पहिल्यांदाच हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठीची सबसिडी २५ हजार रुपयांवरून वाढवून ३५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वित्तमंत्री मारिया विल्सन यांनी बजेट सादर करताना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले आणि टेंडरमधील भ्रष्टाचार रोखल्याचे सांगितले. टीव्हिके सरकारचा 'नीट' (NEET) परीक्षेला विरोध कायम असून १२ वीच्या गुणांवर आधारित जुनी प्रवेश प्रक्रिया लागू करण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाईल, ज्यासाठी राज्यात १० ऑलिम्पिक स्पेशल सेंटर्स स्थापन केली जातील. पर्यावरणासाठी १,७६२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तसेच 'वीडू वेत्री' योजनेअंतर्गत ७० हजार पक्की घरे बांधण्यासाठी ३,५०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या