अहमदनगर

बॉम्बे हाय कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी वर्षभर फटाके फोडण्यास बंदी


मुंबई

बॉम्बे हाय कोर्टाने ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे नागरिक, वृद्ध तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची दखल घेत महाराष्ट्रभरात सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि फुटपाथ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी वर्षभर फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी घातली आहे. हा कठोर नियम केवळ दिवाळीपुरता मर्यादित नसून नवरात्र, दिवाळी आणि क्रिसमस यांसारख्या सर्वच सणांच्या काळात लागू असणार आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, फटाक्यांच्या उत्पादनावर किंवा विक्रीवर कोणतीही बंदी नाही जेणेकरून गरीब कुटुंबांचा व्यवसाय सुरू राहील, परंतु फटाके केवळ निर्धारित ठिकाणीच फोडले जावेत याची जबाबदारी प्रशासनाची असेल. याशिवाय, न्यायालयाने डीजे, लाउडस्पीकर, डॉल्बी साऊंड सिस्टम आणि लेजर लाइटच्या वापराबाबत एका आठवड्यात नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले असून प्रशासनाला पर्यावरणपूरक दिवाळी व हरित फटाक्यांविषयी जनजागृती मोहीम राबवण्यास सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या