अहमदनगर

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी ५ कोटी रुपये घेतले? जाणून घ्या सत्य


नवी दिल्ली

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी यापूर्वी अनेकदा वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली आहे. त्यांनी महाराजांच्या सत्संगाला हजेरी लावली असून, त्यांच्याबद्दलचा आदर आणि श्रद्धा वेळोवेळी व्यक्त केली आहे.

मात्र, सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पहिल्या आश्रम भेटीबाबत एक धक्कादायक दावा केला जात आहे. या दाव्यानुसार, विराट आणि अनुष्का यांना प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये देण्यात आले होते. परंतु, या दाव्याला दुजोरा देणारा कोणताही अधिकृत पुरावा किंवा स्पष्ट दस्तऐवज अद्याप समोर आलेला नाही.

हा आरोप 'श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास'चे अध्यक्ष दिनेश शर्मा (फलाहारी महाराज) यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख केला आहे. राजस्थानमधील एका खाजगी कंपनीने आणि प्रॉपर्टी बिल्डर लॉबीने आश्रमाची व महाराजांची प्रसिद्धी वाढवण्यासाठी विराट कोहलीला ५ कोटी रुपये देऊन जानेवारी २०२३ मध्ये आश्रमात आणल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

विराट आणि अनुष्का यांनी जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा या आश्रमाला भेट दिली होती. त्यानंतरही त्यांनी अनेकदा या ठिकाणी भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले आहेत. सध्या तरी ५ कोटी रुपयांच्या व्यवहाराचे आरोप केवळ चर्चेच्या आणि दाव्यांच्या पातळीवरच असून त्याला कोणताही ठोस आधार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या