अहमदनगर

अमेरिकेचे स्वप्न सोडून घर वापसीला मजबूर भारतीय टेक प्रोफेशनल्स; ग्रीन कार्डचा लांबत चाललेला प्रतीक्षाकाळ आणि छाटणीची भीती


नवी दिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या कडक स्थलांतर व व्हिसा धोरणांमुळे, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील एआय (AI) आणि छटणीच्या लाटेमुळे मोठ्या संख्येने भारतीय टेक प्रोफेशनल्स मायदेशी परतत आहेत. एच-१बी व्हिसा व ग्रीन कार्डच्या लांबलेल्या प्रतीक्षा कालावधीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. 'एक्सफेनो' या स्टाफिंग फर्मच्या आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत १२,९०० प्रोफेशनल्स भारतात परतले आहेत, तर २०२५ मध्ये ही संख्या १५,१०० इतकी होती. याउलट, अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी घट झाली असून २०२५ मधील २१,२०० च्या तुलनेत २०२६ मध्ये आतापर्यंत केवळ १४,८०० लोकच अमेरिकेत गेले आहेत. हाच ट्रेंड राहिल्यास परतणाऱ्यांची संख्या जाणाऱ्यांपेक्षा अधिक होईल. 'एक्सफेनो'चे सह-संस्थापक कमल करंथ यांच्या मते, व्हिसा व कायदेशीर आव्हानांमुळे हा प्रवाह असाच सुरू राहील. दुसरीकडे, टीमलीज डिजिटलच्या सीईओ निती शर्मा यांच्या मते, भारत आता अनुभवी तंत्रज्ञान तज्ज्ञांसाठी एक आकर्षक केंद्र बनत आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सद्वारे (GCC) प्रॉडक्ट ओनरशिप आणि एआय विकासाला मिळणाऱ्या महत्त्वामुळे येथे नव्या संधी निर्माण होत आहेत. या परतीच्या प्रवाहामुळे भारतीय आयटी क्षेत्राला जागतिक अनुभवाचा आणि नवीन फ्रेमवर्कचा मोठा फायदा होत असला, तरी मध्य आणि वरिष्ठ पातळीवर स्थानिक प्रतिभेसाठी स्पर्धा तीव्र झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या