अहमदनगर

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता दिसणार अनोख्या अंदाजात

shreya bugde

प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉड्र्सच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे हिने सांभाळली. तिचे विनोद, तिचा भन्नाट टायमिंग यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी तर आहेच आणि म्हणूनच तिला विविध व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला आवडतेच. त्यामुळे यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये श्रेयाला सूत्रसंचालिकेची भूमिका निभावताना पाहणे म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.यामध्ये तिला महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदवीर भाऊ कदम आणि योगेश शिरसाट साथ देणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या