अहमदनगर

कोळेवाडी घाटात पहाटेच्या दरम्यान नऊ जणांच्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.


राहुरी प्रतिनिधी । शेख युनुस

राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या कोळेवाडी घाटात मंगळवारी पहाटेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एक महिला, एक अल्पवयीन मुलासह नऊ जणांच्या टोळीला पोलीस पथक आणि समस्थ गावकऱ्यांनी सदर नऊ आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतले. सदरची माहिती अशी कि मंगळवारी पहाटेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील असलेल्या कोळेवाडी घाटात काही लोक हे दरोडा, चोरीच्या तयारीत फिरत असल्याचे गुप्त खबर मिळाली असता, खबरीच्या खबरीवरून आणि राहुरी तालुक्यातील कर्तव्य दक्ष पोलीस निरिक्षक प्रताप दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंदे ,पोलीस नाईक रामनाथ सानप, चालक खेडकर आदींच्या पोलीस पथकाने कोळेवाडी परीसरातील गांवकऱ्यांची मदत घेऊन कोळेवाडी घाटात छापा टाकला असता क्षणी त्या ठिकाणातील अंधारात लपून बसलेले आरोपी हे पोलीसांना आणि गावकऱ्यांना पाहुन पळू लागले. पोलीस पथक आणि गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत, त्यांच्या मुसक्या आवळून पोलीसांच्या ताब्यात दिले .यावेळी आरोपी संभाजी शिवाजी पाटील वय ३४, रा देड, ता.शिराळा जि.सांगळी, राहुल लहू डोंगरे वय ३२ रा . मातेगांव जि बीड, अमोल संपत शिंदे वय ३३ रा. खांबे ता.संगमनेर, सोमनाथ शिवराम आगीवले वय ३० रा.  ठाकरवाडी ता खुलताबाद जि औरंगाबाद, अंकूश लक्ष्मण मेंगाळ वय २५ रा ठाकरवाडी, ता.खुलताबाद जि. औरंगाबाद, तुळशीराम दामू मेंगाळ वय ३५ रा ठाकरवाडी खुलताबाद जि. औरंगाबाद, बाळू शिवराय आगीवले वय २१ रा ठाकरवाडी ता खुलताबाद जि औरंगाबाद, कल्पना अशोक शिंदे वय २५ रा खांबे ता संगमनेर जि अहमदनगर, आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एक १७ वर्षीय मुलाचा या टोळीत समावेश आहे. आरोपींकडून २ लाख किंमतीची लाल रंगाची तवेरा गाडी, तिच्यावरती संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सांगळी जिल्हा असा बोर्ड आहे. दोन मोटारसायकल, पाच मोबाईल, गज पक्कड ,सुरा,दोरी ,आणि लाल मिरचीची पुड अश्या प्रकारे सुमारे २लाख,५६हजार६१० रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या