अहमदनगर

आर्थिक मदत नको, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा

हरीण, रानडुक्कर,नीलगाय, वानरामुळे पिकांचे वाटोळे शेतकरी त्रस्त, 
आमदारांकडून लक्षवेधी ची अपेक्षा!


पाडळी शिंदे प्रतिनिधी

हरीण, रानडुक्कर, रोही (नीलगाय), वानर यांच्या कळपाकडून होत असलेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई नको मात्र या जंगली प्राण्यांना तात्काळ घेऊन जा, अशी एक मुखी मागणी पाडळी शिंदे सह परिसरातील  शिवणी आरमाळ, सुरा, सरंबा, नागणगाव, मेंडगाव, बायगाव, अंढेरा, सेवानगर धोत्रा नंदई, सह इतरही गावातील शेतकऱ्यांन कडुन होत असून जेमतेम पावसावर उगवून आलेली खरीप हंगामातील शेत पिके जंगली प्राण्याकडून नासधूस केली जात आहेत. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून शेतकरी मोठया अडचणीत सापडले आहेत. शेती व्यवसाय धोक्यात आला असून याकडे पावसाळी अधिवेशनात आपले लोकप्रतिनिधी आवाज उठवून याकडे शासनाचे लक्ष वेधून लक्ष वेधी मांडून यावर तात्पुरता उपाय योजना न होता कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करतील अशी अपेक्षा पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला लागली आहे. काही सुज्ञ शेतकरी यांनी वन्य प्राणी यांच्या पासून होणारे त्रास व शेतीला तार कंपाऊंड हा पर्याय नसून कायम स्वरूपी उपाय योजना राबविण्यात येऊन वनप्राणी वन विभागाच्या हद्दीतील जंगलात घेऊन जा. नुकसान भरपाई नको मात्र वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भ्रमणध्वनी द्वारे आपले लोकप्रतिनिधी यांच्याकडे करतांना दिसून आले. तर काही शेतकरी वर्गांची व लोकप्रतिनिधीची संभाषण ऑडीओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे. त्यासोबत प्रत्येक शेतकरी वर्गाने अभ्यासपूर्ण मांडणी करून आपल्या वेदना वन्यप्राणी यापासून असलेला त्रास यासाठी फोन करून याकडे लक्ष वेधले जावे अशी मागणी सुद्दा करण्यात येत आहे. शेतकरी वर्ग ऑडीओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल करीत होते. यातून लोकप्रतिनिधी यांच्या कडून सुद्दा सदर बाब शासनाच्या निर्दशनास आणून सुद्दा उपयोग झाला नसल्याचे सांगत होते. पुन्हा नव्याने ही मागणी मांडण्यात येईल अशे आश्वासन देत होते. भरीस भर आधिवेशनाचा बिगुल सुद्दा वाचला असून आपले प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून शासन सुद्दा यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नरत राहील अशी अपेक्षा शेतकरी वर्गांना लागली आहे. शेतकरी वर्गाकडून एकच मागणी करण्यात येत आहे. वन्यप्राणी यांच्याकडून होणारी शेती पिकांची नासाडी थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करा नुकसान भरपाई नकोच अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


"वन्यप्राणी यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना कार्यालयीन मेलवर कळविले असून त्यानीं सदर बाब वनमंत्री  यांच्या कडे वर्ग केल्याचे कळविले असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या

- स्वप्नील वसंतराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पाडळी शिंदे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या