बोधेगाव प्रतिनिधी
शेवगाव शहरात ग्रामीण भागातील 17 वर्षाची हिंदू युवती क्लास साठी आली असता तिच्या मुस्लिम धर्मीय एका मैत्रिणीला सोडविण्यासाठी जात असताना दोन युवकांनी गाडी अडवून चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे
याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की पिढीत ग्रामीण भागातून हिंदू समाजाची 17 वर्षाची एक युवती शहरात बुटी पार्लर च्या क्लास साठी आली होती क्लास नंतर तिच्या मैत्रिणीला घरी सोडण्यासाठी मोटरसायकलवर जात असताना खालची वेश मधून नायकवडी भागातून जाताना
पिडीतने पांढरे रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळया रंगाची जिन्स पॅन्ट व गळयामध्ये भगव्या रंगाचा रुमाल परिधान करुन तिचे मुस्लीम धर्मीय काळया रंगाचा बुरखा परिधान केलेल्या मैत्रिणी सोबत मोटार सायकल वरुन कुंभारगल्ली शेवगाव येथुन जात असताना यातील आरोपी नामे १) सलाउददीन हाशमोदिन शेख रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव ता. शेवगाव २) गुलाम गौषकुरेशी रा खाटीकगल्ली, शेवगाव ता. शेवगाव असे स्कुटी मोटार सायकलवर येऊन पिडीत ही चालवित असलेल्या
मोटारसायकल गाडी आडवी लावुन यातील पिडीत ही हिंदु मुलगा असल्याचे समजुन तो मुस्लीम धर्मीय मुलीस मोटार सायकल वरुन घेऊन जात असल्याचे संशयावरुन पिडीतेचा वाईट उददेशाने हात पकडुन आरोपी ने त्यांचे जवळ असलेल्या चाकुने पिडीतेस जिवे ठार मारण्याचे उददेशाने तीचे गळयावर वार केला असता पिडीतेने डावा हात मध्ये घातल्याने पिडीतेचे डावे हाताचे दंडावर गंभीर दुखापत झाली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार
शेवगांव पोलीस स्टेशन येथे गु.र. नं ५६९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९,७४,१२६ (२), ३ (५) सह बालकांचे लैगिक अत्याचारापासुन संरक्षण व प्रतिबंद अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी सलाउददीन हाशमोदिन शेख रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव ता. शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे सलाउददीन हाशमोदिन शेख हा शेवगाव शहरातील भारदे हायस्कुल चे परीसरात लपुन बसला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी पोलीस पथक तयार करुन त्याचा शोध घेत असताना घेणे सदर आरोपी हा नमुद ठिकाणीहुन पळून जात असतांना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक. प्रशांत खैरे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.संतोष मुटकुळे सपोनि सुदंरडे, पोसई प्रविण महाले, पोहेकाँअदिनाथ खेडकर, पोकों भगवान सानप, पोकों शाम गुंजाळ, पोकों देविदास तांदळे, पोकों राहुल आठरे, पोका अदिनाथ शिरसाठ, पोकों प्रशांत आंधळे, पोकों अस्लम शेख, पोकों भारत अंगरखे, पोकों दादासाहेब खेडकर, नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली आहे या गुन्ह्यांचा तपास धरमसिंग सुदंरडे हे करत आहेत. या घटनेमुळे शेवगावात खळबळ उडाली आहे
0 टिप्पण्या