पैठण येथील नागघाटावर कार्यक्रम संपन्न
पैठण प्रतिनिधी
दक्षिण काशीतील जुन्या पैठण मधील प्रसिद्ध नागघाटावर ज्ञानेश्वर व भावंडांना मुंजीसाठी शुद्धिपत्र देण्यासाठी धर्मन्याय पिठाची खास सभा बोलविण्यात आली होती.सभेत धर्मपिठाचार्य व ज्ञानेश्वर महाराजा मध्ये अनेक प्रश्नोत्तरे झाली. संन्याशांची पोरे असल्यामुळे मुंजीच्या परवानगीसाठी तोडगा निघत नसल्यामुळे हे प्रकरण काय वळण घेते, याकडे यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर उभा राहिला. ज्ञानेश्वर महाराज व धर्मपिठात चर्चेवर चर्चा होत असतानाच ज्ञानेश्वर महाराजांनी ग्यान्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून धर्मपिठाला सुखद धक्का दिला.
या घटनेस माघ शुद्ध वसंत पंचमी पर्वावर दि.14, बुधवारी 737 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज मूर्ती सह रेड्यामूर्तीचा महाअभिषेक पुरोहित रविंन्द्र शेवतेकर व गणेश शेवतेकर यांच्या मंत्र घोषात महंत संकेत पुरी यांनी केला. यावेळी बंडेराव जोशी, दिनेश पारिक आदींनी मनोगत व्यक्त केले. भाविकांनी याप्रसंगी भारुडे , भजने, भावगीते, राष्ट्रीय गीते म्हटली ज्ञानेश्वर महाराज मूर्ती व रेडा मूर्तीवर यावेळी भक्तांनी पुष्पवृष्टी करून महाआरती केली. ज्ञानेश्वर महाराजांच्या जय जयकारात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल सराफ, संतोष छडिदार, भालचंद्र बेन्द्रे, प्रभाकर गिरे, संतोष कुलकर्णी, ईश्वर मस्के, कमलेश देशपांडे, सुर्यकांत रावस, सचिन जाधव, दिलीप रावस, स्वप्नील देवरे,कांन्ता वरकड, पंढरीनाथ फूलजळके, मनोज लोहारे, देविदास कामाठी, प्रसाद खिस्ती, मनोज धोकटे, आश्विन गोजरे, मुरली साबळे, मंदाकिनी काळे,पुजा मस्के, अवंती कामाठी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
पैठणच्या पालथी नगरीतील उपद्रवकारक,हानिकारक, त्रासदायक वेड्या बाभळी गेल्या अनेक वर्षात काढलेल्या नाहीत त्या त्वरित काढून पालथ्या नगरीतील परिसरात दर्जेदार उच्च प्रतीची हिरवळ लावावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे त्याकडे मराठवाडा विभागीय केंद्रीय पुरातत्व खात्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे इतिहास प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या