अहमदनगर

शुक्रवारी घारगावात नागनाथ महाराज यात्रोत्सव


घारगाव

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव चा यात्रोत्सव  शुक्रवार दि.  2 मे  शनिवार 4 मे असा तीन दिवस चालणार आहे. बस स्थानकापासून मंदिरापर्यंत आकर्षक असे विद्युत रोषणाई केली आहे.  मंदिराची आकर्षक असे सजावट करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटेपासून मंदिरात अभिषेक, दंडवत सुरू राहतील, दुपारी तीन वाजता श्रींची स्थापना, तीन ते नऊ शेरनीचा कार्यक्रम होईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा मिरवणूक नंतर छबिना ,शोभेची दारू फटाक्याची आतिषबाजी होईल.रात्री 11वाजता भिका भीमा लोकनाट्य चा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी 3 तारखेला जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे.नामांकित मल्ल हजेरी लावणार आहेत. वजनानुसार पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. रविवारी रात्री नऊ ते बारा या वेळेत शुभांगीनी थोरात यांचा नव्या  नव्या जुन्या गाण्यांचा आर्केस्ट्रा चा कार्यक्रम होणार आहे.

तरी यात्रेसाठी सर्वांनी उपस्थित राहून यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती नागनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या