अहमदनगर

हिंगणगाव मध्ये पोटच्या अल्पवयीन मुलीवरच नराधम बापाने केला बलात्कार तालुक्यात खळबळ !


शेवगाव प्रतिनिधी
 

नराधमाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून शेवगांव पोलिसांनी आरोपी एकनाथ जयराम भोसले यास काही तासात अटक केली आहे या माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाला पीळ पाडणारी घटना शेवगांव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे 

या बाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की हिंगणगाव ने येथे एकनाथ भोसले या नराधम पित्याने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या वय १५ वर्षे १० महिने २३  दिवसाचे वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर  हिंगनगाव येथे पीडित मुलगी आई आणि नराधम  वडिल एकनाथ भोसले हा राहत आहेत. दारुचे नशेत फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आई यांना  नेहमी मारहान करुन घाणघाण शिविगाळ करत होता.

दिनांक  २५ मे रोजी पीडित मुलीची बहीण पायल भारत मुळे व पायलचे पती भारत प्रेम मुळे दोघे रा. राहुरी हे घरी हिंगनगाव ने येथे आले होते. तेव्हा नराधम  वडिल एकनाथ जयराम भोसले याने दारुचे नशेमध्ये माझी बहिन पायल व दाजी भारत यांचेशी भांडण केले त्यामुळे दाजी व बहिण हे राहुरी येथे त्यांचे घरी त्याच दिवशी परत निघुन गेले होते. त्यानंतर पीडित मुलीची आई आणि पीडित मुलगी  या आरोपी वडिलांना  घाबरुन घरातुन पळुन जाऊन नातेवाईकांकडे राहिले. दि २७ मे रोजी पीडित मुलगी आणि तिचे  काका किरण जयराम भोसले परत त्यांचे घरी हिंगणगाव ने येथे आली होते . दि २९ मे रोजी सायंकाळी  ५  वाजता च्या  सुमारास पीडित मुलीचे  वडिल एकनाथ भोसले हा  दारु पिवुन नशेत पीडित मुलीचे  काका किरण भोसले यांचे घरी आले त्यावेळी घरात पीडित अल्पवयीन मुलगी  व तिची  काकी कविता किरण भोसले असेअश्या दोघीच घरात असताना पीडित अल्पवयीन मुलींच्या नराधम  वडिलांनी त्यांचे जवळ असणारा रामपुरी चाकु पीडितेच्या  काकीला दाखवुन म्हणाला  की, माझ्या मुलीला तु तुझ्या घरी का ठेवले आहे. त्यामुळे पीडित मुलीची काकी घाबरुन तिचे घरातुन दुर पळुन गेली होती. त्यानंतर नराधम  वडिल एकनाथ भोसले यांने  स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीचा  हात धरून हिंगणगावातील  बेळगे पाटील यांचे घराजवळील उसाचे शेतात घेवुन गेला  व चाकुचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची दमकी देवुन स्वतःच्या पोटच्या पोरी सोबत  बळजबरीने  चाकूचा धाक दाखवून शारिरीक संबंध करुन बलात्कार केला. त्यानंतर उसाचे शेतातुन नराधम बाप  एकनाथ भोसले  पुन्हा हाताला धरुन ओढत घेवुन जावु लागला  असताना पीडित मुलीने त्यांचे हाताला चावा घेवुन तेथुन पळ काढला  चुलती कविता किरण भोसले हिचे घरी जावुन सर्व घडला प्रकार सांगितला त्यानंतर  काकी कविता भोसले हिने पीडितेच्या  आई सुरेखा, आत्या व ईतर  नातेवाईकांना फोनव्दार घडला प्रकार सांगितला त्यानंतर पीडित मुलीचे सर्व नातेवाईक  घरी आल्यानंतर मी नराधम  वडिल एकनाथ जयराम भोसले यांच्या विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

शेवगांव पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शन खाली सहकाऱ्यांनी फिर्याद दाखल होताच काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या