अहमदनगर

नगरपरिषदेत खोटा लेआउट सादर करणाऱ्यांवर कारवाई


बोधेगाव प्रतिनिधी 

शेवगाव नगरपरिषदेने शेवगाव येथील व्यवसाय निमित्त मुंबई येथे स्थाईक असलेले विठ्ठल भास्कर भारदे आणि अनंत भास्कर भारदे यांच्याविरोधात खोटे दस्तऐवज सादर करून नगरपरिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई नगरपरिषदेचे नगररचना विभागातील लिपिक संजय विठ्ठल साखरे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, दि‌. 12 जून 2025 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिनांक 28 मे 2025 रोजी ही बाब निदर्शनास आली असल्याने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत चौकशीसाठी लेखी आदेश दिले होते. त्यानुसार, गट क्रमांक 746/1 ते 5 मधील रहिवासी लेआउटची कोणतीही मंजुरी नगरपरिषदेमार्फत देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, भारदे बंधूंनी खोट्या जावक क्रमांक व बनावट शिक्क्यांच्या आधारे विकास परवानगी आदेश व नकाशा सादर करून जमीन विक्री सुरू केली असल्याचे दिसून आले.

सुनावणीदरम्यान नगरपरिषदेचे सहायक नगररचनाकार नरेंद्र तेलोरे आणि अभियंत्यांनी सखोल तपासात स्पष्ट केलं की, सदर रेखांकन मंजूर नसताना खोटे कागदपत्र तयार करून नगरपरिषदेची फसवणूक झाली आहे.

संजय विठ्ठल साखरे यांच्या फिर्यादीवरून करण्यात नामांकित  भारदे बंधूंवर फसवणूक, बनावट दस्तऐवज सादरीकरण आणि सार्वजनिक संस्थेची फसवणूक केल्याबद्दल विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेकडो लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या