बोधेगाव प्रतिनिधी
समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय, राक्षी येथे आयोजित “मेगा ओपन कॅम्पस ड्राईव्ह २०२५” मध्ये उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले.
या उपक्रमात एकूण ४८९ विद्यार्थ्यां पैकी २४२ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली.
या कॅम्पस मध्ये सुदर्शन केमिकल्स प्रा. लि., वेबसम्स सॉफ्टवेअर, कोडमाइन्स टेक्नॉलॉजीज, जीएमसीसी प्रा. लि., यूकेबी प्रा. लि., एपिटॉम, सिओयोन ऑटो प्रा. लि., जॉन डिअर, लक्ष्मी अग्नी कॉम्पोनंट्स फोर्जिंग, कोस्मो फिल्म्स, एसीई वाय इंजिनिअरिंग, मॅस्कॉर प्रिसिजन प्रा. लि., बाजेल प्रॉडक्ट्स लि., फ्रॉइडेनबर्ग फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजीज, रेव्हेन्ट प्रिसिजन इंजिनिअरिंग, एव्हिएंट कॉर्पोरेशन, रेणू इलेक्ट्रॉनिक्स, पांसे ऑटो, फिल्ट्रम, मनिषा कॉम्पोझिट्स, लिटल इटली फूड्स, बीगुआस ऑटो, ओंकार प्रिसिजन, जस्ट डायल, टेक्नो इंडिया, अॅक्सिस बँक आणि कलर व्हिजन.
आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या
सुदर्शन केमिकल्स, रोहा या आघाडीच्या कंपनीचे व्यवस्थापक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार संधी, मुलाखतीची तयारी, आणि कौशल्य विकास यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे यशा बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परिणामाधिष्ठित शिक्षणपद्धती (Outcome Based Education – OBE) प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
नियमित शैक्षणिक तासिका, ट्युटोरियल, प्रात्यक्षिके यांसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. गेस्ट लेक्चर, औद्योगिक भेटी, मायक्रो प्रोजेक्ट, स्व-अभ्यास, खेळ आदी माध्यमांतून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अद्ययावत माहिती, कौशल्ये आणि आत्मविश्वास प्रदान केला जातो.
"याचाच परिपाक म्हणजे आज विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे गौरवशाली यश आहे,"असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. एकनाथराव ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केले.
या यशामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, विश्वस्त ऋषिकेश ढाकणे सचिव सौ जया रहाणे ढाकणे, प्राचार्य डॉ. अंबादास डोंगरे, एमबीए प्राचार्य डॉ. रियाज खान आत्तार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. महेश मरकड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. संतोष आंधळे, पॉलिटेक्निक समन्वयक डॉ. प्रवीण नागरगोजे आणि अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. सुनील अवताडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. घुटे, प्रा. बोराळे, प्रा. मस्के, प्रा. घाडगे, प्रा. शिरसाठ, प्रा. बटुळे, प्रा. मोटाळे, प्रा. गुजर, प्रा. देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.
पॉलिटेक्निकच्या ३३ व एमबीएच्या 4 विद्यार्थ्यांचा निवडीबद्दल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मानीत केले
हा गौरव सोहळा विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला सलाम देणारा ठरला.
हा उपक्रम केवळ रोजगार मेळावा नव्हता,तर तो ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे, गुणवत्तेचे आणि बदलत्या भारताचे प्रतिबिंब होता. अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींच्या दारे खुली झाली असून संस्थेच्या ‘शिक्षणातून स्वाभिमान’ या ध्येयवाक्याला खरी उजळणी मिळाली आहे.
0 टिप्पण्या