प्रांत आधिकारी,तहसिलदारांनी समजुत काढल्यावर महिला पाण्यातुन बाहेर आल्या
बोधेगाव प्रतिनिधी
वंजारी समाजास अनुसूचित जमाती( एस.टी.) प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या प्रमुख मागणी साठी शेवगांव तालुक्यातील वाडगांव येथील युवक परमेश्वर उर्फ पप्पू केदार, डॉ. अभिजीत गीते आणि युवराज जवरे हे गेल्या दहा दिवसा पासुन येथील कानिफनाथ मंदिरात उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ संतप्त आंदोलकांनी आज शुक्रवारी दि १० रोजी थाटे ,वाडगांव आणी परिसरातील महिलांनी थाटे आणी वडगावच्या सरहद्दीवर असणाऱ्या पाझर तलावात पाच सहा फूट इतक्या पाण्यात उतरुन जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले . शेवगांव पाथर्डी चे उपविभागीय आधिकारी तथा प्रांत प्रसाद मते,शेवगांव चे तहसिलदार आकाश दहाडदे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणी इतर आधिकांऱ्यांनी आंदोलक महिलांची बराच वेळ समजुत काढल्यावर ग्रामस्थ व महिला पाण्याच्या बाहेर आल्या आणी आंदोलन सुमारे तीन तासांनी मागे घेण्यात आले.
दरम्यान या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असुन राज्य भरातुन आंदोलन स्थळी वंजारी समाजाचे अनेक नेते,कार्यकर्ते आणी तरुण दररोज शेकडोच्या संख्येने संखेने येत आहेत. सुमारे पाचशे ते सहाशे लोकसंख्या असलेल्या या गावाला सध्या यात्रेचे स्वरूप आले आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी बोधेगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले तसेच शेजारील कोनोशी गावातील अमोल दौंड या युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केली.
दिवसेंदिवस या आंदोलाने स्वरूप मोठे होत आहे.
खा. निलेश लंके तसेच तहसिलदार, प्रांतधिकारी हे शासनाचे स्थानिक अधिकारी,वगळता वरिष्ट आधिकारी कि मंत्री या आंदोलकांकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलकांत संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी वंजारी समाजाचे जेष्ठ नागरिकांनी केली आहे. उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावली गेली आहे
0 टिप्पण्या