अहमदनगर

आरक्षणासाठी नैराश्यातून कोनोशीच्या २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रशासनाचे दुर्लक्ष, वंजारी समाजात संताप


बोधेगाव प्रतिनिधी
 

तालुक्यातील कोनोशी येथे वंजारी समाजाला आरक्षण न मिळाल्याने नैराश्यातून अमोल दौंड वय २० यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना आज घडली आहे घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते प्रशासनाचे अधिकारी आल्याशिवाय प्रेत खाली न घेण्याचा निर्णय झाल्याने वातावरण चांगले तापले होते. तहसीलदार दहाडदे  आल्यानंतर मृतदेह काढण्यात आला.

अमोल दौंड हा वाडगाव ग्रामस्थानी वंजारी समाजाला एस टी मध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात गेल्या आठ दिवसापासून सक्रिय होता दोन दिवसापूर्वी बोधेगाव येथे रस्ता रोको आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आरक्षणच्या भूमिकेबाबत ते अग्रेसर होता. प्रशासनाने आंदोलकांची दखल न घेतल्याने ग्रामस्थांतून चीड व्यक्त होत असतानाचा अमोल दौंड याने राहत्या घराजवळ नवीन पत्र्याच्या घरात दोरीने गळ्याला फास लावून आत्महत्या केली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच शेवगाव चे तहसीलदार आकाश दहाडदे, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक महाले यांनी तातडीने घटनाथळी भेट दिली त्यानंतर मृतदेह काढण्यात आला. अमोल च्या खिश्यात एक चिठ्ठी लिहिलेली आढळून आली त्यामध्ये "आमच्या जातीचे काही खरे नाही मी स्वतःला संपवतो"  अमोल दौंड असा मजकूर आढळून आला आहे.  


सरपंच राजेंद्र दौंड यांनी काय मागणी केली

कोणोशीचे सरपंच राजेंद्र दौंड म्हणाले आरक्षणासाठी आमचे युवक आत्महत्या करत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा या प्रश्नाचा तीव्र राज्यभर उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे 

शांततेत आंदोलन करावे टोकाची भूमिका घेऊ नका तहसीलदार दहाडदे 

शेवगाव येथील वाडगाव येथे वंजारी समाजाकडून  आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण अजूनही सुरू आहे. या आत्महत्येनंतर आंदोलनाला अधिक तीव्र वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तहसीलदार आकाश दहाडदे यांनी समाजाला शांततेचे आवाहन करत सांगितले की, "आरक्षणाच्या मागणीबाबतचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. कोणत्याही तरुणाने टोकाचे पाऊल उचलू नये. असे ग्रामस्थांना सांगितले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या