अहमदनगर

बारामती विमान अपघात: AAIB चा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध, शेवटच्या क्षणी वैमानिकाचे 'ते' शब्द आले समोर


मुंबई

बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघाताप्रकरणी एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) आपला पहिला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विमानतळावरील काही त्रुटींकडे बोट दाखवण्यात आले असून, वैमानिकांच्या बाजूने कोणतीही चूक नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. अपघातापूर्वी वैमानिक आणि एअर कंट्रोल रूम यांच्यातील संवाद अत्यंत सामान्य होता, मात्र अचानक 'ओ शिट.. ओ शिट..' असे शब्द ऐकू आले आणि त्यानंतर विमानाचा संपर्क तुटून अपघात झाला. विमानाचे दोन्ही रेकॉर्डर मागील भागातून हस्तगत करण्यात आले असून, ते बराच वेळ आगीच्या संपर्कात असल्याने डेटा रिकव्हरीसाठी दिल्लीतील प्रयोगशाळेत विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.

अहवालानुसार, दोन्ही वैमानिकांची 'ब्रेथ ॲनालायझर' चाचणी समाधानकारक आली असून त्यादिवशी हवामानही स्थिर होते. कंट्रोलरने ३ किलोमीटरची व्हिजिबिलिटी असल्याचे कळवले होते, तरीही विमानाने लँडिंगचा प्रयत्न सुरू ठेवला. दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसल्याची माहिती वैमानिकाने दिली आणि बारामती टॉवरने रनवे ११ वर लँडिंगची परवानगी दिली. मात्र, काही क्षणातच वैमानिकाचा शेवटचा ओरडण्याचा आवाज आला आणि विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला क्रॅश झाले. या अपघाताचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी आता रेकॉर्डरमधील रॉ डेटाच्या सखोल विश्लेषणाची प्रतीक्षा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या