अहमदनगर

तेलंगणात १०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले ; सरपंच आणि ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल


तेलंगाणा

तेलंगणातील मांचेरियल जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे १०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किश्तपूर गावात ७-८ मार्चच्या रात्री ही अमानवीय घटना घडली. 'स्ट्रे ॲनिमल फाऊंडेशन ऑफ इंडिया' या एनजीओच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांनी दोन व्यक्तींच्या मदतीने कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन ठार केले आणि मृतदेह नदीकाठी पुरले. या गंभीर प्रकारानंतर जन्नाराम पोलीस ठाण्यात सरपंच आणि ग्रामपंचायतीवर बीएनएस आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात गेल्या काही काळातील कुत्र्यांच्या सामूहिक हत्येची ही मालिका असून, आतापर्यंत अशा प्रकारे मारल्या गेलेल्या कुत्र्यांची संख्या १,३०० पर्यंत पोहोचली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या